चौफेर न्यूज – आज सकाळी ११ च्या सुमारास मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांच्या कृष्णकूंज या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान मागील काही काळापासून राज ठाकरे भारतीय जनता पक्षावर खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले असल्यामुळे भाजप व राज ठाकरे यांच्यात कटुता निर्माण झाली होती. शेलार यांनी त्यामुळे राज यांची आज कशासाठी घेतली याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.

मुंबई भाजपचे नेते कधीकाळी शिवसेनेला शह देण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेला पाठबळ देत होते. खासकरून शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार यांचे राज ठाकरेंशी सख्य होते. पण राज यांनी नंतर मोदी-शहांवर हल्लाबोल सुरू केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंपासून अंतर राखले होते. पण आजच्या भेटीचे औचित्य काय आहे हे अद्याप समोर आले नाही. कदाचित याबाबत दोन्ही पक्षाकडून स्पष्टीकरण काही वेळात दिले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 19 =