चौफेर न्यूज – राफेल करारात पंतप्रधान मोदी यांनीच वायुदलाचे ३० हजार कोटी रुपये लुटले आणि उद्योगपती अनिल अंबानी यांना दिले, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदींनी अनिल अंबानी यांना दिलेल्या पैशाचा मुद्दा आम्ही गेल्या वर्षभरापासून उपस्थित करत आहोत. आता त्या संदर्भात अहवाल देखील प्रसिद्ध झाला असून त्यात मोदी हे राफेल कराराबाबत फ्रान्स सरकारशी प्रत्यक्षपणे सौदेबाजी करत आहेत असे संरक्षण मंत्रालयाने सांगितल्याचेही त्यांनी म्हटले.

मोदी सरकारने राफेल कराराबद्दल सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती सादर केली. याबाबत केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे, तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या देखील खोटं बोलल्या. अनिल अंबानी यांना या करारात समाविष्ट करण्यासाठी मोदी यांनीच मध्यस्थी केली आणि अनिल अंबानी यांना या करारात समाविष्ट करून घेण्यासाठी दबाव टाकला असे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी कबूल केले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

राबर्ट वाड्रा, कार्ती चिदंबरम यांच्यावर आरोप करण्यात येत असून त्याची ED मार्फत चौकशी केली जात आहे. मोदी सरकारने खुशाल त्यांची चौकशी करावी. पण त्याआधी राफेल करारबद्दल पंतप्रधान मोदी आणि त्याच्या सरकारने उत्तर द्यायला हवे, असेही राहुल गांधी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 4 =