पिंपरी चिंचवड शहराचा चारही बाजूने भरमरसाठ विकास सुरु आहे. परंतु, पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून रावेत भागातील रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून रस्त्याला मंजूरी मिळूनही प्रशासन अधिकारी निव्वल आश्वासन देवून विकासकामांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप रावेत भागातील गणेश नगर, शिंदे वस्तीमधील नागरिक संदिप भोंडवे, संजय भोंडवे, विश्वास भोंडवे यांनी केला आहे.

रावेत परिसरातील रेल्वे लाईन, बीआरटीपासून १२ मिटरच्या रस्त्याला मंजूरी मिळाली आहे. याकडे स्थानिक नगरसेवकांकडूनही दुर्लक्ष होत असून रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी निर्माण झाला आहे. महापालिकेच्या ब प्रभागांतर्गत हा परिसर येत असून महापालिकेचा कर भरून देखील येथील नागरिकांना महापालिकेच्या सोयी- सुविधा मिळत नाहीत. पावसाळ्यात येथील मुलांना चिखलातून शाळेत जावे लागते. अधिकारी येतात, मात्र निव्वळ आश्वासन देवून निघून जातात, त्यामुळे येथील विकास रेंगाळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 2 =