पिंपरी ।   शहरातील रावेत, पुनावळे, किवळे, मामूर्डी, शिंदेवस्ती, येथील नागरिकांना थेट प्राधिकरणात येण्याच्या मार्गातील अडथळा आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रयत्नातून मोकळा झाला. यावेळी नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका शैलजाताई मोरे, नगरसेविका शर्मिलाताई बाबर, माजी नगसेवक आर. एस. कुमार, पिं. चिं. शहर महिला संघटिका उर्मिलाताई काळभोर, सरिता साने, वैभवी घोडके, राजेश फलके, अमोल निकम, माधव मुळे, किशोर जोशी, संतोष सायकर, बाळा शिंदे, रवी हिंगे, अजय प्रधान, महेंद्र सोनवले, नितीन घोलप आदी यावेळी उपस्थित होते.

     येथील नागरिकांना सोसायटीतून जावे लागत होते. मात्र यामुळे निर्माण होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार चाबुकस्वार यांनी एमआयडीसीच्या ताब्यातील सव्वा एकर जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्यासंदर्भात प्रयत्न केले त्यानुसार महापालिकेने जागेपोटीची रक्कम एमआयडीसीला अदा केल्यानंतर या प्रश्नावर तोडगा निघाला. आज आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − 7 =