राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री जयंती साजरी

साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमीत्त स्कूलच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्कूलचे प्राचार्य अतुल देव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.

तत्पूर्वी , महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांची प्रतिमा पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी, व्यवस्थापक तुषार देवरे, इंद्रजित देशमुख, शालीग्राम बच्छाव, शांताराम सुर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी, इ.४ थीतील समिक्षा बच्छाव, गुरुप्रसाद कानडे, सोहम पंजाबी, इ.६ वी तील निशांत देसले या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्रींच्या जीवनाविषयी माहिती दिली.

त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जिवनातील प्रसंग, त्यांचे सत्यवचन, अहिंसा याविषयी थोडक्यात माहिती सांगीतली. लाल बहादुर शास्त्रींच्या जीवनातील अनेक प्रसंग गोष्टीरुपाने विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमाची रुपरेषा वैशाली खैरनार यांनी आखली. सुत्रसंचालन विद्यार्थींनी जयती बिरालाल जैन हिने केले. सुंदर रांगोळी रेखाटन भाग्यश्री बेडसे, सिमा मोरे यांनी केले. फलक लेखन मोहन गावीत तर छायाचित्रण ललित अहिरराव यांनी टिपले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + 19 =