पिंपरी चिंचवड ः घरोघराचा कचरा संकलित केला जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर यांनी बुधवारी स्थायी समिती सभागृहाबाहेर कचरा फेकला आहे. महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी आयोजित केली होती. शहरात कचराकोंडी झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य मयूर कलाटे, पंकज भालेकर यांनी सभागृहाबाहेर कचरा फेकून निषेध केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले आहे. शहरातील कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना देण्यात आले. तर, दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना देण्यात आले आहे. दोन्ही कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यात आले आहे. कचरा संकलन आणि वहन या कामाचा बोजवारा उडाला आहे. ‘घरोघरचा कचरा संकलित केला जात नाही.  गृहनिर्माण सोसाट्यांमधील कचरा उचलण्यावरुन वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. कचरा कुंडीच्या बाहेर पडलेला कचरा उचलला जात नाही. केवळ कुंडीतीलच कचरा उचलला जात आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचल्याने नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर यांनी आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × one =