चौफेर न्यूज – निगडी ः भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने नॅनो कारला धडक दिली. त्यामुळे नॅनो कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात कारमधील जखमी झालेल्या वृद्ध चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात प्राधिकरण निगडी येथील भेळ चौकात 2 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास झाला. विनय शंकर काळोखे (वय 60, रा. सेक्टर नं 26, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालिदास काळोखे (वय 63) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मयत कालिदास हे 2 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास नॅनो कार घेऊन भेळ चौकातून जात होते. त्यावेळी एक रिक्षाचालक भरधाव वेगात आला. त्याने कालिदास यांच्या कारला धडक दिली. यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात कालिदास यांच्या हनुवटी व छातीला मार लागला. त्यातच ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी अज्ञात रिक्षाचालक अपघाताची माहिती न देता पसार झाला. कालिदास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =