चौफेर न्यूज – रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.  रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे. यातील ठराविक रक्कम दसऱ्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उर्वरित रक्कम दिवाळीच्या बँक खात्यात जमा होईल. रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 4 =