मुलाखतीतून दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

चौफेर न्यूज – विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणा-या रोहितने भारताला वन-डे मालिकेपाठोपाठ टी-२० मालिकेतही विजय मिळवून दिला आहे. इंदूरच्या टी-२० सामन्यात रोहितने आपल्या शतकी खेळीत १० उत्तुंग षटकार ठोकले. मात्र लहानपणी क्रिकेट खेळताना रोहितला आपल्या याच आक्रमक फलंदाजीमुळे जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. अशी हदय आठवण त्याने निवेदक गौरव कपूर याच्या कार्यक्रमात सांगत, आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

माझ्या लहानपणी दिवसभरातला बहुतांश वेळ टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघण्यामध्ये जायचा. यानंतर शाळेत असताना बराचवेळ मी, माझे भाऊ आणि मित्रपरिवार सोसायटीच्या आवारात क्रिकेट खेळायचो. लहानपणीही सोसायटीत क्रिकेट खेळताना मी अनेक घरांच्या काचा फोडल्या आहेत. माझे शेजारी माझ्या या आक्रमक फलंदाजीने नेहमी त्रस्त असायचे. काही जणांनी कंटाळून पोलिसांत आमच्याविरुद्ध तक्रार केली. त्यानंतर एक दिवस पोलिसांनी घरी येऊन मला सांभाळून क्रिकेट खेळण्यास सांगितले. यापुढे तुझी तक्रार आली तर तुला जेलमध्ये टाकेन, असा सज्जड दमच मला पोलिसांनी भरला. मात्र त्यानंतरही आम्ही क्रिकेट खेळणे कधीही सोडले नाही.

याव्यतिरीक्त रोहित शर्माने गौरव कपूरने घेतलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आणि क्रिकेट कारकिर्दीतले अनेक किस्से सांगितले. बायको रितीकासोबतची पहिली भेट, ड्रेसिंग रुममधली सहका-यांसोबतची धमाल-मस्ती अशा अनेक खुमासदार आठवणींनी भरलेल्या या एपिसोडला सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − seven =