चौफेर न्यूज – टीम इंडियाचा कार्यवाहक कर्णधार रोहित शर्माने भारत आणि बांगलादेश यांच्यात निदाहास चषकात झळकावलेल्या अर्धशतकाच्या बळावर भारताने चषकावर नाव कोरले. कार्तिकने श्वास रोखून धरणाऱ्या अखरेच्या निर्णायक षटकांमध्ये भारताकडे विजय खेचून आणला. रोहित शर्माने काल झालेल्या सामन्यात ५६ धावांची निर्णायक खेळी केली. त्याने ४२ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने आपले १६ व्यांदा ५० पेक्षा आधिक धावा केल्या आहेत. त्याने यावेळी गेल आणि मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडित काढला. त्याच्यापुढे आता फक्त विराट कोहली आहे. टी-२०मध्ये विराट कोहलीने १८ वेळा हा पराक्रम केला आहे. तसेच न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आणि विंडीजचा गेल या यादीत तिसऱ्या स्थानी असून १५ वेळा अशी कामगिरी त्यांनी केली आहे.

काल झालेल्या सामन्यात टी-२०मध्ये रोहित शर्माने सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो जगातील एकूण दहावा तर भारताचा तिसराच खेळाडू ठरला. विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी याआधी भारताकडून सात हजार धावांचा टप्पा पार केला आहे. रोहित शर्मा काल झालेल्या सामन्यात २६ वी धाव घेताच सात हजार धावा करणारा भारताचा तिसरा तर जगातील दहावा फलंदाज बनला आहे. वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल या यादीत प्रथम स्थानावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − 9 =