पिंपळे सौदागरमध्ये आमदार चषकक्रिकेट स्पर्धा

चौफेर न्यूज –  पिंपळेसौदागर येथील शिवराज काटे स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक २०१९ भव्य हाफ पिच लॉन टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळेसौदागरमधील रोझ आयकॉन सोसायटीच्या शेजारील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर होणाऱ्या या स्पर्धेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढिदिवसादिवशी म्हणजे १५ एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शिवराज काटे यांनी दिली.

एम. के. बॉईज, भूषण काटे स्पोर्टस् फाऊंडेशन, बनसा ग्रुप, शशि काटे स्पोर्टस् फाऊंडेशन, सौदागरचा राजा, अजिंक्य भिसे स्पोर्टस् फाऊंडेशन, विश्वशांती प्रतिष्ठाण, उन्नती सोशल फाऊंडेशन, शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन व पिंपळेसौदागर ग्रामस्थांच्या सौजन्याने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला शिवराज काटे यांच्या वतीने रोख ५१ हजार रुपये, उपविजेत्या संघाला नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या वतीने रोख ३१ हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघाला सूरज काटे यांच्या वतीने रोख २१ हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकाच्या संघाला क्रांती मित्र मंडळाच्या वतीने रोख ११ हजार रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर खेळाडूला सोन्याची अंगठी व चषक, सामनावीर खेळाडूला दोन हजार रुपये व चषक, उत्कृष्ट गोलंदाजाला दोन हजार रुपये व चषक आणि उत्कृष्ट फलंदाजाला दोन हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + eighteen =