चौफेर न्यूज –

  राष्ट्रप्रेरणा जागृत होण्यासाठी समाजातील सर्व घटकातील नागरिकांना लोकमान्य टिळक यांनी एकत्र केले. यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला, असे प्रतिपादन उपमहापौर शैलजा मोरे यांनी पिंपरी येथील दै. केसरीच्या विभागीय कार्यालयात केले.

केसरी मराठा ट्रस्ट व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक यांच्या 97 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर मोरे बोलत होत्या.  महापौर नितीन काळजे यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नीळकंठ चिंचवडे होते. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापती सिमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेविका कमल घोलप, शर्मिला बाबर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अतूल शितोळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, दैनिक केसरीचे मुख्य वार्ताहर विजय भोसले आदी उपस्थित होते.

उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या की, इंग्रजांविरूध्द असंतोष निर्माण करण्यासाठी सर्व समाज एकत्र आला पाहिजे. त्यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव  सुरू केला. लोकमान्यांच्या विचाराची समाजाला आजही गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. महापौर नितीन काळजे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य काळात जो आदर्श घालून दिला, त्याची आजही नितांत आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी लोकमान्यांना आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − six =