चौफेर न्यूज –

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे थोर क्रांतीकारी होते. भारतीय जनतेत स्वराज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करीत स्वातंत्र्याची सिंहगर्जना करून त्यांनी समाजाला प्रेरित केले, असे मत साक्री येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती पंजाबी यांनी व्यक्त केले. लोकमान्य टिळक यांच्यापुण्यतिथी निमीत्त मंगळवार दि. १ रोजी स्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात पंजाबी बोलत होत्या. यावेळी, व्यवस्थापक वैभव सोनवणे प्रमुख उपस्थित होते.

तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमीत्त युकेज वर्गातील विद्यार्थी कौस्तुभ गवळे, परिश बोरसे यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्वेता रौंदळ यांनी केले. भारती पवार, श्वेता रौंदळ, पुनम पवार, सुनीता पाटील, वृषाली सोनवणे, प्रिती लाडे, प्रतिभा आहिरराव, स्नेहल पाटील, हिरल सोनवणे, जयश्री नांद्रे, बंदिश खैरनार, दिपक आहिरे, शांताराम पगारे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, कल्पना देसले, रंजना सुर्वे, मंगल पवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

  

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − 6 =