पिंपरी : दिवाळीनिमित्त लोणावळा शहरात भरविण्यात आलेल्या ऐतिहासिक किल्ले बनवा स्पर्धेत मोठ्या गटात आकुर्डी येथील श्री गणेश मित्र मंडळ (तोरणा किल्ला) व करंडोली गावातील शिवगर्जना ग्रुप (लोहगड) यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. तर लहान गटात कुणेगाव ग्रुप कुणेगाव (तोरणा) व हनुमान तरुण मंडळ कुसगाव (प्रतापगड) यांना प्रथम क्रमांक देण्यात आला.
लहान मुले व तरुणांमध्ये गड किल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना गड किल्ल्यांचा इतिहास समजावा याकरीता श्री योध्दा प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ प्रमोटर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स व मे. रमेश पाळेकर बिल्डर अ‍ॅन्ड डेव्हलपर्स यांच्या वतीने दरवर्षी दिवाळी सुट्टयांमध्ये या स्पर्धा भरविल्या जातात. स्पर्धेचे हे 7 वे वर्ष असून 52स्पर्धक संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
स्पर्धेतील विजयी संघ : मोठा गट – प्रथम क्रमांक – श्री गणेश मित्र मंडळ आकुर्डी (तोरणा) व शिवगर्जना ग्रुप करंडोली (लोहगड), द्वितीय क्रमांक – शिवाजी मित्र मंडळ नांगरगाव (कोसळीगड) व जाखमाता मित्र मंडळ तुंगार्ली (कोराईगड), तृतीय क्रमांक – छावा ग्रुप बोरज (प्रतापगड) व राजहंस मित्र मंडळ ओळकाईवाडी (तुंग व तिकोणा), उत्तेजनार्थ – 2डी इंजिनिअर्स आकुर्डी (प्रतापगड) व स्वामी समर्थ ग्रुप नांगरगाव (प्रतापगड).
लहानगट : प्रथम क्रमांक – कुणेगाव ग्रुप (तोरणा) व श्री हनुमान मित्र मंडळ कुसगाव बु. (प्रतापगड), द्वितीय क्रमांक – शिवबा ग्रुप तुंगार्ली (राजगड) व श्रीमंतयोगी प्रतिष्ठान नांगरगाव (सिंधुदुर्ग), तृतीय क्रमांक – वलवण क्रिडासंघ वलवण (मल्हारगड) व नवनाथ मित्र मंडळ दत्तवाडी (लोहगड), उत्तेजनार्थ – शिवबा मित्र मंडळ नांगरगाव (रोहिडा गड) व राजहंस मित्र मंडळ ओळकाईवाडी (लोहगड). यासह मावळातील मानाची मंडळं म्हणून भैरवनाथ तरुण मंडळ कुसगाव व पेठे इंजिनिअरिंग नांगरगाव यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्त इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांचे व्याख्यान झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस आयचे मावळ तालुकाध्यक्ष डॉ. किरण गायकवाड, उद्योजक रमेश पाळेकर, रामदास शेलार, विनय विद्वांस, शिक्षण मंडळाचे सभापती गणेश साबळे, बबनराव माने, पंकज गादिया, संतोष राऊत, हरिष कोकरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड, जितेंद्र कल्याणजी, बाळासाहेब फाटक, नारायण पाळेकर, सुनील गायकवाड, डॉ. सिमा शिंदे, मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष अशोक कुटे, प्रतिष्ठानचे संस्थापक रुपेश नांदवटे, अध्यक्ष संगाम भानुसघरे, चंद्रकांत गाडे, सदाशिव सोनार, विजय भानुसघरे, संतोष खराडे, लक्ष्मण केदारी, उल्हास पाळेकर, ओमप्रकाश जाधव, आनंद गावडे, भारत चिकणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 5 =