चौफेर न्यूज –  गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार चिंचडवडमधील रामनगर येथे घडला. मयूर संजय विटेकर (वय-19, रा. शेलार चाळ, रामनगर, चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव माने (वय-22), रमजान शेख (वय-19, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) व अन्य एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूरची रामनगर मध्ये वडापावची हातगाडी आहे. वैभव, रमजान व त्यांचा आणखी एक मित्र यांनी किसनला गणपती उत्सवाची वर्गणी मागितली. त्यावरून आरोपी व किसनमध्ये वाद सुरु झाले. वैभवने गाडीवरील झारा उचलून किसनला मारहाण केली. रमजान व अन्य एका आरोपीने किरणला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मयूर गेला असता वैभवने सिमेंटचा गट्टू त्याच्या डोक्‍यावर मारला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × two =