पिंपरी :– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी दिवाळीमध्ये वाकड-पिंपळे निलखच्या विकासकामांची घोषणा करून येथील नागरिकांना दिवाळी भेट दिलेली होती. ती विकासकामे प्रगतीपथावर असून या परिसरातील नागरिकांना लवकरच अनुभवायला मिळणार आहेत.

सभापती ममता गायकवाड यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, वाकड-पिंपळे निलख या प्रभागात काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत सिमेंट काँक्रिट चा रस्ता करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट कॉंक्रिट चा करणे, पिंपळे निलख मधील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणे, कावेरी सब वे ते पिंक सिटी रस्ता सिमेंट काँक्रिटचा करणे, वाकड पिंपळे निलख मध्ये विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र करणे, वाकडमध्ये रोड फर्निचरची कामे करणे, वाकड गावठाण मधील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणे, वाकड येथील भुजबळ वस्ती मधून काळाखडक मार्गे भूमकर वस्ती येथील हिंजवडी ३१ MDR रस्त्यालगत जोडणारा ३० मीटर रस्ता विकसित करणे, अशी जवळजवळ ९२.८५ कोटीची विकासकामे स्थायी समितीच्या मार्फत वाकड-पिंपळे निलखमध्ये होऊ घातलेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + 2 =