चौफेर न्यूज – अवैधरित्या दारूची रिक्षातून वाहतूक केल्या प्रकरणी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. रिक्षातून एकूण 225 लिटर दारूचे सात कॅन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई वाकड पोलिसांनी सोमवारी वाकड चौकात करण्यात आली. सागर नरसिंग चांढके (वय 29, रा. आंबेडकर पुतळ्यामागे, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना माहिती मिळाली की, गावठी हातभट्टी दारूची अवैधरित्या वाहतूक करणारी एक रिक्षा वाकड चौकात येणार आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनी परिसरात सापळा रचून एम एच 12 / डी टी 0969 या क्रमांकाच्या रिक्षाला अडविले. रिक्षामध्ये ठेवलेल्या कॅनची तपासणी केली असता त्यात गावठी हातभट्टीची दारू असल्याचे आढळले. त्यानुसार रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात एका महिलेचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून संबंधित महिलेचा शोध घेणे सुरू आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, प्रमोद कदम, मधुकर चव्हाण, नितीन गेंगजे, शाम बाबा, श्रुती सोनवणे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + 19 =