चौफेर न्यूज मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींच्या वाकड पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मंगेश नामदेव पालवे (वय २८, रा.मु.पो.रिहे, मोरवाडी, ता.मुळशी, जि.पुणे) आणि करण रतन रोकडे (वय २१, रोकडे वस्ती, चिखली, पुणे) असं या आरोपींची नावे असून एकाला पाठलाग करून तर एकास सापळा रचून वाकड पोलीसांनी अटक केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि.६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मंगेश पालवे हा आरोपी वाकड येथील भुमकर चौकात आला होता. त्यावेळी पोलीस नाईक गणेश गिरीगोसावी आणि सुरज सुतार यांच्या समोर येताच आरोपी पालवेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर पोलीसांनी त्याची चौकशी केली असता, तो खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असून पौड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यास पौड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

रविवार दि.७ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कस्पटे चौक वाकड येथे वाकड पोलीसांच्या टिमची कारवाई सुरू असताना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्काच्या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी करण रतन रोकडे दिसून आला. माऊली टी सेंटर समोर तो उभा होता. त्यावेळी पोलीसांनी सापळा रचून करण रोकडे याला अटक केले. त्याची सखोल चौकशी केली असता देहूरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून तो फरार असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला देहूरोड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे,  परिमंडल २ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतिश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजन, पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस कर्मचारी कांता बनसोडे, रमेश गायकवाड, विक्रम कुदळ, गणेश गिरीगोसावी, सुरज सुतार, नितीन गेंगजे, मुकेश येवले, सचिन जगताप, वेलापूर, प्रशांत गिलबिले, व अविनाश गायकवाड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 1 =