पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) 25 खाटांचा तिसरा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. यामुळे चिंताजनक रुग्णांवर तत्काळ उपचार करणे सोईचे होणार आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
पिंपरी महापालिकेचे संत तुकारामनर येथे वायसीएमएच रुग्णालय आहे. या रुग्णालयात शहरातून तसेच जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. महाराष्ट्राच्या अनेक भागातून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयामध्ये अनेक विभाग उपलब्ध असून, अल्पदरात उपचार केले जातात. यापूर्वी 15 खाटांच्या क्षमतेचा एकच आयसीयू असल्याने रुग्णांचे हाल होत होते. गेल्या महिन्यात नव्याने 18 खाटांच्या बेडच्या दुसर्‍या वॉर्डची उभारणी केली आहे. लवकरच 25 खाटांचा तिसरा अतिदक्षता विभाग सुरू होणार आहे. सध्या रुग्णालयातील दोन अतिदक्षता विभाग सुरू आहेत. तिसर्‍या विभागाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयूच्या वॉर्डमुळे चिंताजनक रुग्णांवर रुग्णालयात उपचार करणे सोईचे होणार आहे.
 ’’वायसीएमएच रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त असते. नवीन अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. तिसर्‍या आयसीयूचे काम थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल’’.   डॉ. शंकर जाधव, वैद्यकीय उपअधीक्षक, वायसीएमएच रुग्णालय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 18 =