चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय व निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रासाठी ४५९ किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास व ऊर्जा निर्मिती करणा-या संस्थेबरोबर पंचवीस वर्षासाठी स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत ऊर्जा खरेदी करारनामा करण्यास मंजुरी देवून महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ९ कोटी ३२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड  होत्या. पिंपरी चिंचवड महानगरपलिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला दरमहासंचलन तुटीपोटी ६ कोटी व सवलतीचे पासेस पोटी १ कोटी ५० लाख असे एकूण ७ कोटी ५० लाख देण्यात येतात. त्यामधून ४१ लाख रुपये सन १९९३ व १९९४ मध्ये लेखा परीक्षणाची आक्षेपाधिन रक्कम वसूल करुन उर्वरित रक्कम ०७ कोटी ०९ लाख रुपये अदा करण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे पदव्युत्तर पदवी शिक्षण संस्था सुरु करणे बाबत कार्यवाही चालु असल्याने स्वंतत्र वेबसाईट सुरु करण्यासाठी येणा-या सुमारे १ लाख ९१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

मनपाच्या विविध कार्यालयामध्ये इंटरनेट बॅण्ड विडथ व एम.पी.एल.एस व्दारे सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी येणा-या सुमारे २ कोटी १० लाख रुपयांच्या खर्चास स्थायीसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 4 =