पिंपरी चिंचवड ः उत्तरप्रदेश वाराणसीनगर निगम येथील अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. करसंकलन, आकाशचिन्ह परवाना, भूमि आणि जिंदगी, सारथी संगणक प्रणाली, पाणी पुरवठा व मलनिस्सारण या विभागास भेटी देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. या शिष्टमंडळात वाराणसीनगर निगम येथील मुख्य लेखाधिकारी अनिल कुमारसिंह, उप आयुक्त जगदीश यादव, मुख्यकर अधिकारी सुरज सिंह, अभियंता सह सचिव राघवेंद्र कुमार, झोनल अधिकारी पी.के. व्दिवेदी, कोआर्डीनेटर कम्पयुटर संदीप श्रीवास्तव, पीएमयु प्रतिनीधी संदीप कुमार, राजस्व निरीक्षक प्रतिक सिंह, आयडीपी प्रतिधी अरविंदकुमार पांडे आदी अभ्यांगत शिष्टमंडळामध्ये सहभागी होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, माहिती व जनसंपर्क विभागचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराची माहिती देणारी चित्रफित त्यांना दाखविण्यात आली. तसेच अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी महानगरपालिकेच्या मिळकतकर विषयक कामकाजाची सविस्तर माहिती दिली. यावेळी सायन्सपार्क येथील शिक्षण अधिकारी एन.टी.कासार, प्रविण वैष्णव व नितीन गाडे यांनी सायन्स पार्क विषयी माहिती दिली. अ‍ॅटोक्लस्टर बाबतची माहिती प्रसाद गोरे यांनी शिष्टमंडळास दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen + one =