चौफेर न्यूज – लोकसभा निवडणुकीला चार वर्ष पुर्ण झाले असुन गेल्या चार वर्षाचा लेखाजोखा आज खासदार श्रीरंग बारणे यांनी मांडला. लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाला १६ मे रोजी चार वर्ष पुर्ण झाले.पिंपरी – चिंचवड महापालिकेचा नगरसेवक ते देशातील सर्वोच्च असलेल्या लोकसभाचा सदस्य हा राजकीय प्रवास करीत असताना कामाबरोबर अनेक अनुभव ही आल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील व देशाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. खासदार बारणे लोकसभेचे सदस्य झाल्यापासून संसदेमध्ये आत्तापर्यंत ९३५ तारांकित व अतारांकित प्रश्न मांडले तसेच २५५ वेळा प्रत्यक्ष चर्चेत त्यांनी सहभाग घेतला तर १६ महत्वाच्या विषयांवर खाजगी विधेयके मांडली. त्यांची लोकसभेतील एकूण उपस्थिती ९४% राहिली असून या अर्थ संकल्पीय अधिवेशनात १०० टक्के उपस्थिती राहिली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांना संसदेतील उत्कुष्ट कामाबद्दल प्राईम पॉईंट फाउंडेशनचेन्नईच्या वतीने सलग तिनवेळा “ संसद रत्न पुरस्कार ” मिळाला याच बरोबर मावळ लोकसभा मतदार संघामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची कामे मार्गी लावली त्यामध्ये पिंपरी व पनवेल येथे पासपोर्ट सेवा केंद्रास मंजुरी घेतली. उरण येथील घारपुरी एलिफंटा लेणीचा देशाच्या पर्यटन विकास क्षेत्रात समावेश. केंद्र सरकारच्या दिन दयाल उपाध्याय ग्राम जोती योजने अंतर्गत स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी कर्जत तालुक्यातील तुंगी, डोंगरपाडा या अतिशय दूर्गम आदिवाशी भागात केलेला वीज पुरवठा, पुणे लोणावळा तिसऱ्या व चौथ्या नवीन रेल्वे ट्रँकसाठी केलेला पाठपुरावा, पनवेल ते उरण जे.एन.पी.टी राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करण्यास मंजुरी मिळवू कामाला सुरवात केली, तळेगाव ते चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग क्र.५५ यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून  केंद्र सरकारकडून मंजुरी घेतली आहे, पिपंरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात साठलेला गाळ सातत्याने तिन वर्ष काढून पाण्याचा साठा वाढल्याने भर उन्हाळ्यातही पिंपरी चिंचवड शहरात पाणी कपात नाही हे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कामाचे यश आहे. कल्याण–मुरबाड–कर्जत-भीमाशंकर या नवीन मार्गास केंद्र सरकारकडून  मंजुरी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले त्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला आहे, मराठा आरक्षण मुद्दा सर्वप्रथम लोकसभेत मांडला, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे हा तारांकित  प्रश्न लोकसभेत उपस्थित केला, कार्ला, भाजे, एलिफंटा लेणी तसेच रायगड, विसापूर, लोहगड, राजमाची, तुंग, तिकोना या किल्यांच्या संवर्धनासाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी पाठपुरावा केला, पिंपरी येथील हिंदुस्तान एन्टीबायोटिक कंपनी पुनर्निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून १०० कोटीस मंजुरी, माथेरान येथील ऐतिहासिक मिनी ट्रेन बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला असताना प्रयत्न करून पुन्हा मिनी ट्रेन चालू केली व तेथील मार्गाची दुरुस्ती व नवीन इंजिन घेण्यासाठी केंद्रसरकारकडून मोठी तरतूद केली, क्रांतिविर चाफेकरांच्या नावाने पोष्टाचे तिकीट काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लवकरच त्यांच्या नावाचे तिकीट प्रकाशीत होणार आहे, संरक्षण खात्याशी निगडीत असलेल्या विविध प्रश्ना संदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री यांची भेट घेवून रेड झोन व मावळ मधील मिसाईल प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या जमीनीना योग्य मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा केला व वाढीव रक्कम मंजुर करून घेतली. शेतकऱ्यांस मोबदला न देता औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेले मावळ तालुक्यातील ७३२ हेक्टर क्षेत्र वगळण्याचा महत्वपुर्ण निर्णय बारणे यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे, पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांच्या अनाधिकृत बांधकाम व शास्तिकराच्या प्रश्ना संदर्भात सातत्याने  शासनाकडे पाठपुरावा केला. अशा अनेक प्रश्नासाठी प्रयत्नशिल असणारे खासदार श्रीरंग बारणे यांची एकूनच चार वर्षाची कारर्किद प्रभावी झाली आहे सर्वाधिक संपर्क असणारे खासदार म्हणुन त्यांची ओळख निर्माण झाली असुन जनमानसातला काम करणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ख्याती झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × four =