पिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) – पिंपरी चिंचवड शहराचा आतापर्यंत झालेला विकास हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच माध्यमातून झाला आहे. या विकासामध्ये टाटा मोटर्स समोरील उड्‍डाण पुल, कुदळवाडी चौकातील ग्रेड सेप्रेटर व उड्‍डाण पुल, संत सांवतामाळी उद्यान, मोशी प्राधिकरणातील व्हॉलीबॉल मैदान, टेनिस कोर्ट, न्यायालय, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय, ट्रॅफिक थिम पार्क, जिल्‍हा औद्योगिक केंद्र, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, केएसबी चौकातील उड्‌डाण पुल व ग्रेड सेप्रेटर आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र या मोठ्या विकास प्रकल्‍पांचा समावेश आहे. या विकास कामांच्या जोरावरच शहरामध्ये पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येऊन ‘हॅट्रिक’ होणार आहे. यात जाधववाडी, मोशीतील नागरिकांचे देखील योगदान असणार आहे. त्यामुळे प्रभाग क्र. दोन मधील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्‍याचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.
प्रभाग क्र. दोन जाधववाडी आणि मोशी मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रा. कविता संदेश आल्हाट, शुभांगी विशाल जाधव, घनशाम शांताराम जाधव, राहुल वसंत बनकर यांनी शनिवारी सेक्टर क्र. 16 शिवतेज नगर येथे डायझोनेल मॉल समोर कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर शरद बो-हाडे, नगरसेविका साधना जाधव, नगरसेवक अरुण बो-हाडे, राजेंद्र गायकवाड, दत्ता जगताप, ॲड. शेखर गायकवाड, ॲड. विशाल जाधव, विठ्‍ठल आहेर, गणपत आहेर, शिवाजी बोराटे, मयुर बनकर, नरेंद्र बनकर, नारायण बो-हाडे, भानुदास बो-हाडे, दिलीप बो-हाडे, मुरलीधर बनकर, अतिन अल्‍हाट, वंदना जाधव, सुनील बोराटे, गणेश सस्‍ते, दिलीप भुजबळ, हिरामण तळेकर, गणेश शिवले, संजू हजारे, विकास जाधव, हनुमंत करपे, रवी भुजबळ आदी उपस्थित होते.
माजी आमदार लांडे पुढे म्‍हणाले की, थोर क्रांतीकारक महात्‍मा फुले, बहुजनांचे कैवारी छत्रपती शाहु महाराज, घटनेचे शिल्‍पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा जपणारे लोकनेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांना बरोबरच घेऊन शहराचा सर्वांगिण विकास केला आहे. झोपुनि प्रकल्‍प, आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल योजना, बीआरटी प्रकल्‍प हे जेएनएनयुआरएम अंतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले विकास प्रकल्प आहेत. तर पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना शास्‍तीकरात सवलत दिल्याची आवई उठविणारे खोटारडे युती सरकार जनतेची फसवणुक करीत आहे. त्यांनी प्रथम मागील अडीच वर्षात किती निधी आणला, हे सांगावे. येत्या महानगरपालिका निवडणुकीत येथील मतदार पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच पालिकेची सत्ता सोपवतील, अशी मला खात्री आहे, असे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − 11 =