भाजपच्या कोपरा सभा : जाणल्या सोसायट्यातील रहिवाशांच्या समस्या 
दि. 13 फेब्रुवारी 2017 –  प्रभाग 26 मधील भाजप उमेदवारांनी विकेंडचा मुहूर्त साधत वाकड कस्पटे वस्ती भागातील उच्चभ्रू सोसायटीतील आयटीयन्स आणि रहिवाशांशी कोपरा सभाद्वारे संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.

 

यावेळी केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर महापालिकेत देखील भाजपाची सत्ता आणण्यासाठी मदत करू अशी ग्वाही रहिवाशांनी दिली.  यावेळी रामदास कस्पटे, निखिल कस्पटे, संकेत चोंधे, विशाल कामठे, विवेक कामठे, सागर कामठे, प्रसाद कस्पटे, योगेश विधाते, बाबू चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 26 वाकड कस्पटे वस्ती, विशाल नगर, पिंपळे निलख, जगताप डेअरी, वेणू नगर या भागातून भाजपच्या वतीने ममता विनायक गायकवाड, तुषार गजानन कामठे, आरती सुरेश चोंधे व संदीप अरुण कस्पटे निवडणूक लढवीत आहेत.

 

वाकड कसपटे वस्ती भागात बहुतेक आयटीयन्स वास्तव्यास आहेत शनिवार रविवार हा त्यांचा सुट्टीचा दिवस असल्याचे हेरत या उमेदवारांनी उच्चभ्रू सोसायट्या गाठत कोपरा सभा घेण्यावर भर दिला.

उमेदवारांनी फ्लॉरेन्स आशियाना, निसर्ग दीप, विंड वर्डस, पिंक सिटी, संस्कृती, केशर सोनिगरा, ग्रीन व्हॅली यांसह अनेक सोसायट्याच्या क्लब हाऊस आणि मिटिंग हॉल मध्ये या कोपरा सभाद्वारे सोसायटींचे अध्यक्ष,  सचिव, रहिवाशी नवीन युवा मतदार, स्थायिक झालेल्या उच्चशिक्षित आयटीयन्सशी संवाद साधत समस्यां जाणून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

उमेदवारांनी परिवर्तन हेल्पलाईनद्वारे केलेल्या निस्वार्थी लोकसेवेबाबत रहिवाशांनी कौतुक केले तर हिंजवडीत काम करणारे बहुतेक आयटीयन्स वाकडला वास्तव्य करतात मात्र सक्षम प्रवाशी वाहतूक सुविधेचा अभावी गैरसोय होत असून प्रशस्त बस डेपो, क्रीडांगणे व मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा मागण्या रहिवाशांनी उमेदवारांकडे केल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + 13 =