पिंपळनेर ः प्रतिनिधी

रेथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्रात आला. विद्यार्थ्यांनी येशु ख्रिस्तांच्या जन्मावर आधारात नाटीका सादर करून ख्रिसमसचा आनंद लुटला. यावेळी, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते. दरम्यान, विद्यर्थ्यांनी येशु ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित नाटीका सादर केली. तसेच, खुशियाँ मनाओ जी भर के गाओ’ हे गीत सादर केले. प्रसंगी, ख्रिसमस ट्री, बेल सांताक्लॉज व विविध प्रकारचे गिफ्ट व आकर्षक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच, बारबलमधील विश्वशांतीच्या संदेशातून विद्यार्थ्यांसमवेत प्रार्थना केली. दरम्यान, ख्रिसमसवर आधारित रांगोळीचे रेखाटण्यात आली होती. त्याचप्रमाणे, ख्रिसमस डे स्पेशल फलक लेखन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच, सर्व

विद्यार्थ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 2 =