प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

चौफेर न्यूज

विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आदर व्यक्त केला पाहिजे. गुरुंच्या सुचनांचे पालन केल्यास यश हमखास मिळते, असे मत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी व्यक्त केले.

पिंपळनेर (जि.धुळे) येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुवंदना कार्यक्रमाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मागदर्शन करताना त्या बोलत होत्या.

याप्रसंगी, वेदिका पाटील, अवनी पवार, प्रेम गवळी, अनुष्का अहिरराव, वैष्णवी भामरे, परिन कोतकर, तेजस खैरनार, श्रावणी शेवाळे, लेकराज बिरारीस, प्रणव भदाणे या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत गुरुंविषयी आदर व्यक्त केला.

दरम्यान, गुरुंचा आशिर्वाद घेताना शिष्य अशी रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच, फलक लेखनाच्या माध्यमातून गुरुंच्या चरणावर पुष्पगुच्छ अर्पण करणारे चित्र काढून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गुरु व शिष्याचे महत्व पटवून देण्यासाठी कृषाली भदाणे यांनी द्रोणाचार्य व एकलव्य यांची गुरुदक्षिणा ही गोष्ट सांगून गुरुविषयीचा महिमा विद्यार्थ्यांसमोर मांडला.

तसेच, अनिता पाटील यांनी गुरुंविषयी महत्व पटवून देण्यासाठी “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा” हे गीत सादर केले. त्याचप्रमाणे, गुरुपौर्णिमा या विषयावर रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता पाटील, अर्चना देसले, निलिमा देसले, अश्विनी पगार, पुनम बिरारीस, माधुरी सैदाणे, संगिता कोठावदे, जयेश घरटे यांनी परिश्रम घेतले. कृषाली भदाणे यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 − 15 =