पिंपळनेर – प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये बुधवार दि. ३ एप्रिल रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते. पारितोषिक वितरण प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आरोग्य म्हणजे आर्थिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य होय. जीवन जगत असताना आपण आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही चायनीज खाद्य पदार्थांऐवजी घरच्या अन्नाला महत्त्व दिले पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील, असे सांगत विद्यार्थ्यांना आरोग्यासंबंधीचे मार्गदर्शन केले. तसेच, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी, शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक राहुल आहिरे उपस्थित होते. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृकि तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव याप्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुले आहिरे यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, निलिमा देसले, आश्विनी पगार, पूजा नेरकर, वर्षा भामरे, पल्लवी मोरे, माधुरी साळुंखे तसेच शिक्षकेतर कर्मचारी गणेश जिरे, जयेश घरटे, संगिता कोठावदे, सुरेखा खैरनार आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने स्कूलच्या प्रांगणात सुंदर अशी रांगोळी तसेच फलक लेखन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 4 =