पीसीसीओईची राष्ट्रीय तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न
 
पिंपरी – अभियांत्रिकी शिक्षणातून देशाला भेडसावणा-या विविध सामाजिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी संशोधनाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रकल्प मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अशा संशोधनातून व विविध प्रकल्प स्पर्धातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मुल्य, सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होईल असे प्रतिपादन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.
         पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), क्लॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (क्युसीएफआय) व डिझाईन इनोव्हेशन सेंटर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान विषयक प्रकल्प व प्रदर्शन स्पर्धा भोसरीतील क्लॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी क्युसीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम, प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, डॉ. शितल भंडारी, समन्वयक प्रा. उमेश पोतदार आदी उपस्थित होते.
        या स्पर्धेत देशभरातून अभियांत्रिकीच्या 412 विद्यार्थ्यांनी 137 प्रकल्प सादर केले. यामध्ये ऊर्जा, शेती, परिवहन, आरोग्य, वैद्यकीय, सार्वजनिक स्वच्छता व डिजीटल इंडिया या क्षेत्रातील प्रकल्प अहवाल होते. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ विद्यापीठाचे प्र. कुलगूरू डॉ. नितीन उमराणी, उद्योजक रोहन राजापूरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. स्पर्धेच्या आयोजनात डॉ. शितल भंडारी, प्रा. संजीवन भोईटे, प्रा. अनघा चौधरी, प्रा. दिप्ती खुर्गे, समन्वयक प्रा. उमेश पोतदार आदींनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम आयोजन करण्यात पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्वागत प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ए.एम. फुलंबरकर तर आभार प्रा. उमेश पोतदार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − six =