साक्री : विविध राजे, महाराजे, वन्यप्राणी, अभिनेता, अभिनेत्री, ऋृषी यासह संतांच्या पोशाखाने साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमधील बालविश्‍व खुलले. शाळेतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ब्युटीशियन पूनम नांद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. व्यवस्थापक तुषार देवरे व शिक्षिका यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या वेळी पोशाखानुसार अभिनयही सादर केला. पूनम नांद्रे, मुख्याध्यापक अतुल देव, भाग्यश्री पाटील यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. मंगेश बेडसे आणि सहावीतील विद्यार्थीनी गायत्री देसले यांनी सूत्रसंचालन केले. गीतल कोठावदे यांनी संयोजन केले.
विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे : पहिली ते तिसरी गट : प्रथम – रसिका चालसे, निधी पाटील. द्वितीय – आदित्य शर्मा, तृतीय – नील देसले, चौथी ते आठवी गट : प्रथम – नरेंद्र शिरसाठ, द्वितीय – युगंधरा देसले, लुब्धा देसले, तृतीय – यशस्वी पारख, भूमिका पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =