भारतीय महिला संघ पराभूत

महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. महिला विश्वचषकातील इंग्लंडचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे.

संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर हातातील विश्वविजेतेपद गमावण्याची वेळ आली. प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले. मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही. अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला माफक धावसंख्येत रोखल्यावर समोर माफक आव्हान असले तरी सलामीची स्मृती मंधाना (0) आणि कर्णधार मिताली राज (17) या झटपट बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला होता. मात्र  एक बाजू लावून धरणाऱ्या पूनम राऊतने हरमनप्रीत कौरच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत भारताचे आव्हान कायम ठेवले.  मात्र पूनम राऊत (87) आणि वेदा कृष्णमूर्ती (35) या बाद झाल्यानंतर भारताची तळाची फळी कोसळली. सहा बळी टिपणाऱ्या अॅना श्रुबशोल हिने सहा बळी टिपत यजमान संघाला लढतीत पुनरागमन करून दिले. श्रुबशोलच्या भेदक माऱ्यामुळे भारताचा डाव 3 बाद 191 वरून सर्व बाद 219 असा कोलमडला. अखेर भारतीय महिला संघाला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय इंग्लंडच्या अंगाशी आला. झुलन गोस्वामी, पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या भेदक माऱ्यामुळे चांगली सलामी मिळाल्यानंतर त्याचा फायदा इंग्लिश फलंदाजांना उचलता आला नाही. लॉरेन विल्फ्रेड (24) टॅमी बेमाँट (23) आणि हेदर नाइट (1) या झटपट बाद झाल्या. त्यामुळे इंग्लिश संघावर दबाव आला.

त्यानंतर सार टेलर (45) आणि  नताली स्कीवर (51) यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. तर तळाच्या कॅथेरिन ब्रंट (34), जेनी गन (25) आणि लॉरा मार्श (14) यांनी इंग्लंडच्या डावात उपयुक्त योगदान दिले. पण अपेक्षित धावगती राखता न आल्याने त्यांना 50 षटकात सात बाद 228 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून . झुलन गोस्वामीने 3, पूनम यादवने 2 आणि राजेश्वरी गायकवाडने 1 बळी टिपला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 − 9 =