चौफेर न्यूज – सध्या देशभर फिटनेस चॅलेंज देण्याचा ट्रेंड जोरात असून त्यात टीम इंडियाच्या विराट पासून पंतप्रधान मोदींपर्यंत सर्व गुतले आहेत. कोल्हापूर रेंजचे इन्स्पेक्टर जनरल विश्वास नांगरे पाटील यांनीहि या फिटनेस चॅलेंज मध्ये उडी घेतली असून त्याच्या विभागातील पोलिसांना वजन उतरावा आणि मनपसंत ठिकाणी बदली मिळावा असे आव्हान दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या फिटनेसचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. नांगरेपाटील यानाही त्याची जाणीव आहे म्हणून त्यांनी जानेवारी २०१९ पर्यंत ज्या पोलिसांचे वजन नियमानुसार नाही त्यांनी ते नियंत्रणात आणावे यासाठी हे चॅलेंज दिले असून ते यशस्वी करणाऱ्या निवडक २५ पोलिसांना मनपसंत जागी बदली दिली जाईल असा शब्द दिला आहे. कोल्हापूर रेंज मध्ये सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे भाग येतात. नांगरेपाटील यांनी १३ हजार पोलिसांना हे चॅलेंज दिले असून त्यासाठी २६ जानेवारीला एक मॅरेथॉन आयोजित केली आहे.

यात ३ वेगळे वयोगट केले गेले आहेत. ४० वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांना २१ किमी, ४० ते ५० वयोगटासाठी १० किमी आणि ५० पुढच्याना ५ किमी पळायचे आहे. यात जे पोलीस सर्वाधिक वजन कमी करतील त्यातून २५ जणांची निवड करून त्याना हव्या त्या जागी बदली दिली जाणार आहे. सहभागी झालेल्या पोलिसांचा बॉडी मास इंडेक्स नोंदवून घेतला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + two =