पिंपरी : विश्‍व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी तीरावर रविवारी उत्तर भारतीयांच्या छट पूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार महेश लांडगे, जेष्ट नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, विश्‍व श्रीराम सेनेचे लालाबाबू गुप्ता, दिलीप गोसावी व भोसरी, चिंचवड़, चिंबळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निगोजे, नेहरूनगर, आकुर्डी, तळवडे, मोशी, आळंदी कृष्णानगर आदी भागातून हज़ारों भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छटपुजेचे महत्व सांगताना लालाबाबू गुप्ता म्हणाले की, सूर्याची उपसना करण्यासाठी छटपुजेचे व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचिन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. यावर्षी छटपूजा रविवारी असल्याने त्याला विशेष महत्व आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्‍वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. यामूळे येथे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंद्रायणी घाटावर पूजा, भजन, छट लोकगीत सादर करण्यात आले व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
विश्‍व श्रीराम सेना पर्यावरण मंच, आरोग्य मंचाचे अक्रम शेख, मुजफ्फर इनामदार, तुकाराम बिरादार, प्रमोद गुप्ता, धनंजय गुप्ता, रामचरण सिंह, इनौंबि सिंगा, विनोद गुप्ता, मुन्ना प्रसाद, रोहित कुंभार, विकास गुप्ता, देवेंद्र प्रसाद, शाम बाबू गुप्ता, ब्रिजेश प्रजापति आदींनी संयोजनात सहभाग घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 3 =