चौफेर न्यूज : बुध्दपौर्णिमेच्या रात्री ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रगणना सुरू असतानाच पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात अग्निसंरक्षक मंगलदास चौधरी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ताडोबातील व्याघ्रगणनेत घडलेली अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. प्रकल्पातील कोअर झोनमधील कक्ष क्रमांक ९४ मध्ये कार्यरत असलेल्या वनविकास महामंडळाच्या अग्निसंरक्षकास वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मंगलदास चौधरी हा चिमूर तालुक्यातील नवेगावचा रहिवासी होता. बुधवारी बुध्दपौर्णिमेच्या दिवशी काही वन्यप्रेमी गणनेसाठी नवेगाव ताडोबा कोअर झोनमध्ये आले होते. त्यांच्यासमवेत वन विभागाचा कर्मचारी म्हणून अग्निसंरक्षक मंगलदास चौधरी होता. पहाटे ४ वाजताच्या सुमारास चौधरी त्याच्या तीन सहकाऱ्यांसह प्रात:विधीसाठी मचाणीवरून खाली उतरला असता, झुडपात दडून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये चौधरी याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वन कर्मचारी, वन मजुरांना मचाणीवरून खाली उतरण्याची परवानगी नसतानाही चौधरी खाली उतरला, यात त्याला जीव गमवावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − 8 =