चौफेर न्यूज – ३१ डिसेंबरला शनिवारवाड्यावर १ जानेवारीला असणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त व भडकावू भाषणानंतर कोरेगाव भीमाची दंगल भडकली आणि संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. शनिवारवाड्यावर या पार्श्वभूमीवर यापुढे सर्व प्रकारच्या खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात येणार आहे. पोलीस व वाहतूक शाखेच्या वतीने यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून, अशा वादग्रस्त कार्यक्रमांमुळे भविष्यात उद्भवणारे वाद टाळण्यासाठी हा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. लवकरच याबाबतचा अधिकृत अध्यादेश जाहीर करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.

शनिवारवाड्याकडे पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिले जाते. शनिवारवाड्याला पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जून भेट देतात. पुण्याच्या पर्यटनालादेखील शनिवारवाड्यामुळे वेगळी ओळख मिळाली आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी याच शनिवारवाड्यावर कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनजू छात्र संघटनेचा उमर खलिद यांच्या या परिषदेत वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल उसळल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 4 =