चौफेर न्यूज – केरळमधील दोन महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा निकाल दिला होता. या निर्णयानंतरही आतापर्यंत एकही महिलेला अयप्पांचे दर्शन घेता आलेले नाही. अनेक महिला कार्यकर्त्यांनीही मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तीव्र विरोधामुळे त्यांना प्रवेश करता आला नव्हता. दरम्यान, मुख्यमंत्री पी विजयन यांनी ज्या महिलांना दर्शन घ्यायचे आहे, त्यांना पोलिसांनी संरक्षण पुरवण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे शुद्धिकरण विधीसाठी मंदिर समितीकडून दर्शन बंद करण्यात आले. दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्यात आले.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, बिंदू आणि कनकदुर्गा नावाच्या दोन महिलांनी भगवान अयप्पांचे दर्शन घेतले. दोन्ही महिलांनी व्हर्नाकुलर वृत्त वाहिनीशी बोलताना आज पहाटे साडेतीन वाजता दर्शन घेतल्याचे सांगितले. महिलांबरोबर पोलीस होते. त्यांच्याबरोबरच त्या मंदिरात गेल्या. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती उघड करण्यात आली नव्हती, असेही त्यांनी म्हटले.

तत्पूर्वी, आधी शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीवरून केरळमध्ये मानवी साखळी करणाऱ्या महिलांवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या लोकांनी महिला आणि पोलिसांवर दगडफेक केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनीही माध्यम प्रतिनिधींवरही दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी बलप्रयोग करावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − two =