चौफेर न्यूज – पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची घेणार असलेली बहुप्रतीक्षित मुलाखत रद्द करण्यात आली असून आयोजकांकडून हा निर्णय कोरेगाव- भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. पवारांच्या कार्यव्यग्रतेमुळे ३ जानेवारी रोजी होणारी ही मुलाखत याआधी देखील रद्द करून तिचे नियोजन ६ जानेवारी करण्यात आले होते. पण अखेरीस ती पुन्हा रद्द झाली. ही माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली असून बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात ६ जानेवारीस सायंकाळी ५ वाजता पवारांची ही मुलाखत होणार होती. ती मुलाखत राज ठाकरे घेणार असल्यामुळे पुणेकर रसिक मोठ्या उत्सुकतेने या मुलाखतीची वाट पाहत होते.

पण ती मुलाखत आता अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे ही मुलाखत आता कधी होणार हे माहीत नसल्याने अनेकजण हिरमुसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 19 =