शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची मागणी

पिंपरी :- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष महासभा घ्यावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

राहुल कलाटे यांनी याबाबत महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मागील दोन महिन्यात शहरातील कचऱ्याची समस्या अतिशय बिकट झाली होती. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. कचऱ्याच्या प्रश्नावर महासभेत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. कचऱ्याचा प्रश्न गहन असताना विविध कारणांनी महासभा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे कचऱ्याच्या प्रश्नावर महासभेत चर्चा झाली नाही. मागील सभेत कचऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी कचऱ्याच्या प्रश्नावर स्वतंत्र महासभा घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेची विशेष महासभा घेण्यात यावी, अशी मागणी राहुल कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × three =