नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांची मागणी
 
पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणातील पाणी साठा कमी होत आहे. जूलैअखेर शहराला पिण्याचे पाणी पुरेल एवढा साठा धरणात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटर बंद करावेत, अशी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी केली. यासंर्दभात आयुक्तांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पवना धरणातील पाणीसाठा उन्हामुळे झपाट्याने घटत आहे, त्यामुळे शहरास एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. शहरातील पाण्याची गळती थांबवली असती, अनाधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावर कारवाई केली असती, मिळणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणी पुरवठा व्यवस्थित झाला असता. शहरातील नागरीकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागले नसते. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक दिवसाआड पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. पाणी गळती व अनाधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावर उपाय योजना अजूनही केलेल्या नाहीत. शहरातील जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, तसेच बांधकामासाठी पुरविण्यात येणारे पाणी जोपर्यत पावसाळा सुरु होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत बंद करण्यात यावे. त्याच पाण्याचा उपयोग नागरीकांसाठी होईल. तसेच पवना बंद जलवाहिनीचे काम व भामा आसखेड जलवाहिनीव्दारे पाणी पिंपरी चिंचवड शहरास पुरविण्याबाबतचा प्रकल्प त्वरीत मार्गी लावावेत, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 3 =