पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळातील दहावीच्या मुलांनी चांगले गुण मिळविले आहे.

    भोसरीतील श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयात सायली जाधव हिने 95.60 टक्के गुण मिळवत प्रथम, अमेय हांडे 95.20 टक्के, शुभांगी हजारे 94.40 टक्के गुण मिळविले आहेत. तर इंग्रजी माध्यमामध्ये अवंतिका बहिरट हिला 95.40, शेजल पवार हिला 93, आशुतोष रोकडे याने 92.20 टक्के गुण मिळविले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वाय. बी. बाबर, सुवर्णा बाबर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

    चिंचवड स्टेशन येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा 95.55 टक्के निकाल लागला. नयन भालेरावला 93.80, अश्विनी पुजारीला 91, श्वेता लष्करे याला 84.20 टक्के गुण मिळाले. या विद्यार्थ्याचे संस्थेचे ऍड. राजेंद्रकुमार मुथा आदींनी अभिनंदन केले. निगडी येथील शिवभूमी विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. स्नेहल खडके हिला 94.40, दिक्षा चौधरीला 94, अक्षय क्षीरसागरला 93.60 टक्के गुण मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडे, प्राचार्य सुर्यकांत कडू आदींनी अभिनंदन केले. पुनावळे येथील श्रीमती अनुसाई ओव्हाळ व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 78 टक्के निकाल लागला. अंजली रानवडे हिला 90.40, अजय सोनवणेला 86.40, पुष्कर नेवाळेने 82.40 टक्के गुण मिळविले. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद ओव्हाळ, मुख्याध्यापक गणेश गवळी यांनी विद्यार्थ्यांचे अभिऩंदन केले. काळेवाडी येथील बेबीज इंग्लिश हायस्कूलचा 100 टक्के निकाल लागला आहे. रेणुका लोलगे हिला 92.80, रंजना कुमावत हिला 92.20, आकांक्षा पवार हिला 91.80 टक्के गुण मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 − one =