पिंपरी चिंचवड ः पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभूमींचा पर्यावरण पूरक पद्धतीने विकास करावा, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. महापालिकेच्या तळवडे, चिखली, मोशी, चर्‍होली व डुडुळगाव येथील विविध चालू असलेल्या विकास कामांची पाहणी महापौर यांनी केली.

यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसेविका साधना मळेकर, अश्‍विनी जाधव, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बरिदे, जे. डी. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी तळवडे येथील स्मशानभूमीमध्ये सिमाभिंत बांधणे, वृक्षारोपण, पाण्याची टाकी, वीजेची व्यवस्था, स्मशानभूमीसाठी शेड, पोहोच रस्ता, रंगरंगोटी, स्वच्छता गृहाची व्यवस्था, लँडस्केपींग, सुसज्ज पार्कींग आदी सुविधा तातडीने देण्याबाबत महापौर जाधव यांनी अधिका-यांना सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + thirteen =