अनधिकृत फटाक्यांवर कारवाईचा पोलीस उपायुक्तांचा इशारा
पिंपरी चिंचवड ः शहरात फटाक्यांच्या दुकानांची भाऊ गर्दी दिसत असली तरी अग्निशामक विभागाकडे अवघ्या 60 विक्रेत्यांनी परवानगीसाठी अर्ज केला आहे. अनधिकृत फटाका दुकानांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिला आहे. फटाक्यांचा स्टॉल हा मोकळ्या जागेत असावा. फटाके जर पक्क्या दुकानात असेल तर त्याचे छत आरसीसीचे असावे, अशी दुकाने भर बाजारपेठेत नसावी, दुकानात आग प्रतिबंधक यंत्रणा असावी, अशा अनेक जाचक अटी दुकानांसाठी आहेत. फटाके विक्री करणार्‍या बहुतांश जणांना या अटी पूर्ण करणे शक्य नसल्याने ते परवानगी शिवाय दरवर्षी फटाक्यांची दुकाने थाटतात.
फटाके विक्रीमध्ये निम्म्यापेक्षा अधिक फायदा असल्याने विक्रेते स्थानिक पोलीस चौकी आणि पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना मॅनेज’ करतात. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडीचशेहून अधिक फटाक्यांची बेकायदा दुकाने असल्याने पोलिसांची दिवाळी दरवर्षी जोरात असते. तर दुसरीकडे दिवाळीमध्ये कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होते. अशा गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांच्या दुकानांना आग लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यांच्याकडे आग प्रतिबंधक अशी कोणती यंत्रणा देखील नसते यामुळे ऐन सणासुदीत कायद्याला हरताळ फासून ही दुकाने पोलिसांच्याच छत्रछायेखाली गल्लोगल्ली उभारली गेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

20 + three =