मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचा उपक्रम

 

पिंपरी चिंचवड : पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान, आठवडे बाजार, तसेच कृष्णा चौक व इतर उपनगरात कवींनी कवितेच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली. यामध्ये प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, भिंत्तीपत्रके, पथनाट्य, घोषवाक्य, स्पिकरव्दारे, कवितेतून, जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. संविधानाने दिलेले आधिकार, कर्तव्यासाठी तसेच देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. त्यामुळे आपल्या परिसराची जाण व नागरी समस्या जाणून घेणारे अभ्यासू प्रतिनिधी निवडून दिले जातील, आपल्या नागरी समस्या संसदेत मांडल्या जातील, असे सांगण्यात आले.

आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका, मतदान सर्वश्रेष्ठ काम, घ्या मातृभुमीची आण करा मतदान, आपलं मत विकासाला मत, तुम हो महान करके मतदान, ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मतदानाची किंमत नाही घेणार, पण मतदान मात्र जरूर करणार, अशा विविध प्रकारच्या घोषणा, भित्तीपत्रक, रँलीे, स्पीकरव्दारे कवींनी कवितेतून नागरीकांना आवाहन केले. आपल्याला शासनाने दिलेल्या सुट्टीचा उपयोग फिरणे, मौजमजा करण्यासाठी न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी आवाहन केले.

कवी सुहास घूमरे यांनी, तुमच्या मताला किंमत असते, घटनेनेत तुम्हाला दिलेली हिम्मत असते, मत म्हणजे मूक अभिव्यत्तीही असते, हिच तर लोकशाहीची शक्ति असते तर कवी शरद शेजवळ यांनी, दानामध्ये दान महान, मतदान श्रेष्ठदान, मतदान कर मतदारा, दान कर दान. घटनेचा ठेवूनी मान, तू देई योगदान. तर जेष्ठ कवि, साहित्यीक, तुकाराम पाटील यांनी असे आपल्या कवितेतून सांगितले की मतदान आहे, अधिकार थोर, करा मतदान करूनी विचार. आपल्या मताचे मालक आपण, ओळखू आता सज्जन दूर्जन, भारत देशाचे करू संरक्षण, करायला सांगू योग्य कारभार.. कवयित्री मधुश्री ओव्हाळ यांनी ही कवितेतून जनजागृतीचा संदेश दिला.

यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, डॉ. अभिषेक हरीदास, शहराध्यक्ष जोगदंड, संगिता जोगदंड, अरूण पवार, संजना करंजवने, गुलशन नाईकुडे, कामगार कल्याण मंडाळाचे केद्र संचालक प्रदिप बोरसे, कवी शरद शेजवळ, सुहास घुमरे, जेष्ठ कवी तुकाराम पाटील, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, युवक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, ऋतूजा जोगदंड, महाराष्ट्र सचिव जयश्री गागरे, क्षमा धूमाळ, नियाज शेख,सामाजिक कार्यकर्ते आनिल पालकर, जालंदर दाते, जनार्धन बोरले, प्रकाश बंडेवार, प्रदीप गायकवाड, एस.डी.विभुते, अक्षय जगदाळे, नितीन जोगदंड, पि.पि.पिल्ले आदी मान्यवर सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × four =