पिंपरी चिंचवड ः अमृतसर येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत किड्स पॅराडाईज स्कूलची किकबॉक्सर ईश्‍वरी जपे हिने 24 किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत रौप्य पदक मिळविले. भारतातून आलेल्या महिला बॉक्सरमध्ये ईश्‍वरीने महाराष्ट्राचा दबदबा कायम ठेवत खेळी केली. ईश्‍वरीने पहिल्या फेरीत गुजरातच्या खेळाडूस 9-4 च्या फरकाने पराभूत केले. दुसर्‍या फेरीत तेलंगणाच्या खेळाडूस 10-4 च्या फरकाने पराभूत केले. तिसर्‍या फेरीत दिल्लीच्या खेळाडूस 8-2 च्या फरकाने पराभूत केले. महाराष्ट्राचे नाव रौप्यपदकावर कोरले. ईश्‍वरी जपेला रौप्यपदक प्रदान करताना रेखा महाजन (डी. एस.ई. पंजाब मेंबर), राजेश थापा, जसबीर सिंह, सचिन झरे व संदेश साकोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + ten =