चौफेर न्यूज – राज्यातील शाळा अडीच ते तीन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून (दि. १५ जून) सुरू झाल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाचे आकर्षण व कुतूहल असते. आज शाळेच्या पहिल्या दिवशी पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये शाळेच्या शिक्षकांनी नवीन व नियमित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले.

शाळा आणि विद्यार्थी यांचे एक अतुट नाते असते. हा शाळेचा पहिला दिवस कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सुंदर अशा रांगोळीचे रेखाटन व फलक लेखन करण्यात आले.

पहिलीच्या वर्गात नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करणे, शाळेचा पहिला दिवसाची सुरूवात करणे. यामुळे चिमुकल्याचा आनंद द्विगुणित झालेला होता. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. तसेच शाळेबद्दल रुची निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. नवागत विद्यार्थी आज प्रथमच शाळेच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी येत असताना त्याच्या पालकांना कसरत करावी लागत होती.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मनोरंजन म्हणून दृक श्राव्य (टेपरेकॉर्डर) साधनांचा वापर करून कविता शिकविण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे विविध खेळातून मनोरंजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षीका कृषाली भदाणे, पुनम तवर, अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, आश्विनी पगार, पूनम बिरारीस, माहेश्वरी अहिरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी संगिता कोठावदे, जयेश घरटे यांनी सहकार्य केले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 + six =