चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकर १५ दिवसांत माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच चिंचवड येथील जाहिर कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या ‘गाजररूपी’ आश्वासनांच्या निषेधार्थ सर्व विरोधक एकवटले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच विविध सामाजिक संस्थांच्यावतीने महापालिका भवनाबाहेर अनोखे आंदोलन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी शहरवासियांना दिलेल्या त्यांच्याच आश्वासनाचे स्मरण देण्यासाठी विरोधकांनी ‘काऊंट डाऊन’चा (उरलेले दिवस) फलक लावला होता. मात्र आज तो फलक गायब झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाने त्या फलकावर कारवाई केली असल्याचा आरोप विरोधक करू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × two =