साक्री – शिक्षक हा समाजाचा खरा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. म्हणून राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकाचा मोठा वाटा असतो. हा सिंहाचा वाटा उचलणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन प्राचार्या भारती पंजाबी यांनी केले. मंगळवार दि. ०५ सप्टेंबर रोजी प्रचिती प्रि प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षकदिन साजरा करण्यात आला.

‘शिक्षक दिन’ निमित्ताने सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. ‘शिक्षक दिन’ निमित्ताने सुरेख असे फलकलेखन करण्यात आले होते. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाली. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा फुले यांच्या प्रतिमा पुजन झाले. शिक्षक दिनाचे महत्त्व, माहिती शिक्षिका  श्वेता सोनवणे यांनी सादर केली. ‘शिक्षक दिन’ निमित्ताने शाळेतील विद्यार्थी वेदिका हत्तरगे हिने सावित्रीबाई फुले, तनिष्क ठाकरे याने महात्मा फुले, आयुष पाटील – साने गुरुजी तर पार्थ भदाणे – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची वेशभुषा साकारली.

‘शिक्षक दिन’ निमित्ताने शाळेच्या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, प्राचार्या भारती पंजाबी यांना पुष्पगुच्छ देवुन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करुन विद्यार्थ्यांना शिकवणी दिली. प्राचार्या – निहारिका बोरसे, व्यवस्थापक – पार्थ सोनवणे, प्रणित बागुल, व  लक्ष्मी हिने लिपिक यांच्या भुमिका बजावल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पुनम पवार यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − 7 =