विलास लांडे आणि महेश लांडगे यांच्यात ‘दिलजमाई’..?
चौफेर न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमिवर भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यामध्ये जुने राजकीय वाद
विसरून पुन्हा मैत्रीचे संबंध दिसून येत आहे. भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे आणि आम्ही नातेवाईक असल्याचे सांगत त्यांच्यातील
राजकीय वादावर पडदा टाकला होता. त्यावर विलास लांडे यांनी देखील राजकारण आज आहे उद्या नाही. नाती-गोती मात्र कायम असतात. ती पाळावी लागतात, असे
वक्तव्य केल्याने या दोन्ही आजी – माजी आमदारांमध्ये ‘दिलजमाई’ झाली असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेची माहिती देण्यासाठी
आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विलास लांडे यांनी याबाबत संकेत दिले आहे.
राष्ट्रवादीची ‘निर्धार परिवर्तन यात्रा’ शनिवार दि. 3 रोजी शहरात येत आहे. त्यानिमित्त शिरूर आणि मावळ लोकसभेच्या शक्तीप्रदर्शनाची राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली
आहे. शिरुर लोकसभेतील परिवर्तनासाठी राष्ट्रवादीने सर्वांनाच कामाला लागायाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मी देखील काम सुरु केले आहे, असे सूचक वक्तव्य माजी
आमदार विलास लांडे यांनी केले आहे. अशा दोन्ही सूचक वक्तव्यामुळे त्यांच्या लोकसभा उमेदवारीची दावेदारी आणखी बळकट मानली जात आहे.
याबाबत लांडे म्हणाले की, देश आणि राज्यात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्‍चित करणार आहेत. शिरुर
मतदार संघात पक्ष अन् परिवर्तनासाठी मी कामाला लागलो आहे. साहेबांनी आदेश दिल्यास तो पाळणार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले
आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी शिरुर आणि मावळ मतदार संघातून पक्षाचा खासदार निवडून
आणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पक्षाने कामाला देखील सुरुवात केली आहे.
पक्षाच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदार संघातून विलास लांडे यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानुसार
शिररूरमधील कार्यक्रमांना लांडेंनी उपस्थित लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी लांडे यांना निश्‍चित असल्याचे मानले जात आहे. याबाबत पत्रक
ारांनी विचारले असता विलास लांडे म्हणाले, देश आणि राज्यात परिवर्तनाची नांदी असून परिवर्तन होणार आहे. लोकसभेचे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्‍चित क
रणार आहेत. मी पक्षासाठी कामाला लागलो आहे. राष्ट्रवादीत पवारसाहेबांचा आदेश अंतिम असतो. त्यांचा आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. साहेबांनी आदेश
दिल्यास तो पाळणार असल्याचे सांगत लांडे यांनी आपले मनसुबे जाहीर केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमिवर सर्व राजकीय पदाधिकारी आपापली गणित जुळवून घेत आहेत. साम, दाम, दंड, भेद विसरून नाती गोती या गोंडस
भावनेच्या भरात जुन्या वादावर पडदा टाकण्याचे कामही सुरु आहे. परंतु, असे असतानाही पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दखल देखील इच्छुक
ांनी घेण्याची गरज आहे. आपले राजकीय वर्चस्व साधण्यासाठी निवडणुकांच्या माध्यमातून वाद निर्माण होतात. जसजशा निवडणुका जवळ येतात, तसतसा वादावर पदडा
टाकला जातो. परंतु, या पारंपारिक राजकीय वारसामुळे निवडणुक लढविणारे कार्यकर्ते दुखावतात. याकडे राजकीय नेत्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे नाती – गोती
ठिक आहे हो, एकनिष्ठ लढणार्‍या कार्यकर्त्यांचे काय? असा सवाल देखील कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + ten =