पिंपरी, दि. 20 फेब्रुवारी २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सह आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्यधिकारी एम. एम. शिंदे, उद्यान अधिक्षक डी. एन. गायकवाड आदी उपस्थित होते.

महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमानंतर हिंदुस्तान अँटीबायोटीक्स कंपनी वसाहत, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, भक्ती शक्ती उद्यान निगडी, थेरगाव, प्रेमलोकपार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त मिनीनाथ दंडवते, सहाय्यक आरोग्यधिकारी एम. एम. शिंदे, उद्यान अधिक्षक डी. एन. गायकवाड, मुख्य आरोग्य निरिक्षक रमेश भोसले, कनिष्ठ अभियंता शामसुंदर भंडारी, शामसुंदर बनसोडे, उद्यान निरिक्षक जे. व्ही. पटेल आदी उपस्थित होते. पिंपरी वाघेरे व रहाटणी शाळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही सहाय्यक आयुक्त चंद्रकांत खोसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी सिताराम बहुरे, मुख्य आरोग्य निरिक्षक पाटील, सौदाई आदी उपस्थित होते. त्यानंतर लांडेवाडी, भोसरी व मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मोहननगर येथील पुतळ्यास सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × five =