पिंपरी चिंचवड  जमीनीच्या खेरेदी विक्रीच्या व्यवहारातून एक डॉक्टराची २२ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे पदाधिकारी अनंत कोऱ्हाळे यांच्यासह ८ जणांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. महेश शिवाजी पांढरपट्टे (वय ३३, रा.ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, अनंत कोऱ्हाळे यांच्यासह अंगद नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलानी, प्रदीप वाघमारे, अनुप सिंग, स्वप्नील काटे, भिवा दास, माणिक रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. १९ मे २०१५ ते २० एप्रिल २०१९ च्या कालावधीत यांच्यात चिखली गट क्रमांक ३८३ येथील जमीनीबाबत व्यवहार झाला होता. तसेच त्या जमीनीबाबत खरेदीखत करण्यात आले होते. दरम्यान ही जमीन दुसऱ्याच्याच नावावर असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. याबाबत विचारले असता तुम्हाला दुसरी जागा देतो. मात्र त्यासाठी आणखी थोडी रक्कम द्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादीकडून २२ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र अद्याप फिर्यादी यांना जमीन किंवा रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − five =