पिंपरी चिंचवड ः चिंचवड पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी सदिच्छा भेट घेऊन दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीरंग बारणे म्हणाले की, गणेशोत्सव, नवरात्र व इतर सर्व सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी सणासुदीतही सुट्टी न घेता आपले कर्तव्य पार पाडणार्‍या पोलीसांप्रती कृतज्ञता म्हणून शुभेच्छा देणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी पोलीस विभागाची आहे, तशीच आमची देखील आहे. आम्ही देखील सार्वजनिक जीवनात काम करणारे कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, डॉ. दिलीप कामत, अनंत कोर्‍हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, उमेश गोलांडे, विशाल गावडे, सुर्यकांत भोसले, विनायक माने, दर्शना संगमे, पोलीस मित्र संघटनेचे सुभाष मालुसरे, मधुकर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 4 =